राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर विधान परिषदेत गोंधळ घालणाऱया सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला होता. यावेळी भाजप आमदाराने भर सभागृहात विरोधी पक्ष नेत्याविरुद्ध हातवारे आणि शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या दानवे यांनी शिवसैनिकाचा अवतार धारण करत आमदाराला त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले. मात्र विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाची बाजू ऐकून न घेता अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन केले आहे. या निलंबनानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी त्यावर आक्षेप घेत चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी सभापतींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.