शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचे आयोजन

शिवसेना शाखा क्रमांक 94 च्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, 19 जानेवारीला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत खार पूर्व येथील गुरुसिंग गुरुद्वारा सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि रुग्णांची वेळीच रक्ताची गरज पूर्ण व्हावी, यासाठी अधिकाधिक लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांनी केले आहे.

 शिवसेना शाखा क्रमांक 193 च्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘भगवा जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रक्तदान शिबीर रविवार, 19 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत प्रभादेवी म्युनिसिपल शाळेमध्ये होणार आहे. हे शिबीर शिवसेना नेते खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाखाप्रमुख संजय भगत यांनी केले.

 शिवसेना शाखा क्र. 215 आणि जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने ताडदेवमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रविवार, 19 जानेवारीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महिलांचे स्नेहमिलन व हळदीपुंकू कार्यक्रम होणार आहे तसेच आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती एसएससी व्याख्यानमालेचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजन करणात आले आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते, कोल्हापूर-सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, युवासेना उपसचिव हेमंत दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर यांनी केले आहे.