निवडणूकीत राम मंदिराचा फायदा व्हावा यासाठी केंद्रातील भाजप सरकारने अपूर्ण बांधकाम असलेल्या राम मंदिराचे घाईघाईत उद्घाटन केले होते. दरम्यान या मंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. पहिल्या पावसातच हे मंदिर गळू लागले आहे. रामलल्ला विराजमान असलेल्या गाभाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी झिरपू लागल्याची तक्रार मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीच केली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश!
निवडणुकीमुळे मोदींना पूर्ण न झालेल्या कामांच्या उदघाटनांची एवढी घाई लागली होती की, त्या घाईचे परिणाम आता जनतेला भोगावे लागतायत. विकासाच्या नावाखाली फक्त जनतेचा पैसा उधळला गेला, पण पुढे निष्पन्न काहीच झालं नाही. pic.twitter.com/NjRdd2Zpw5
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 25, 2024
यंदा पावसाळा सुरू झाला आणि मोदी सरकारच्या कामाची पोलखोल झाली. मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी घाईघाईत अपूर्ण बांधकाम असलेल्या राम मंदिर व कोस्टल रोडचे उद्घाटन केले. त्यामुळे पहिल्याच पावसात या ठिकाणी गळती सुरू झाली आहे. सोबतच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला देखील भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले आहे.
शिवसेनेकडून X या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्या माध्यमातून मोदी सरकावर टीका केली आहे. ”पहिल्याच पावसाने केला मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश. निवडणुकीमुळे मोदींना पूर्ण न झालेल्या कामांच्या उदघाटनांची एवढी घाई लागली होती की, त्या घाईचे परिणाम आता जनतेला भोगावे लागतायत. विकासाच्या नावाखाली फक्त जनतेचा पैसा उधळला गेला, पण पुढे निष्पन्न काहीच झालं नाही, अशी टीका या व्हिडीओतून करण्यात आली आहे.