शिवसेनेचे कम्युनिकेशन क्षेत्रात पाऊल, रामनवमीच्या मुहूर्तावर शिवसंचार सेना स्थापन; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेनेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक पाऊल पुढे टाकत श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज शिवसंचार सेनेची स्थापना केली. शिवसंचार सेना कम्युनिकेशन्स क्षेत्रात काम करणार आहे.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेचे बोधचिन्ह आणि नामफलकाचे आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कम्युनिकेशन्स क्षेत्रात कोणतीही संघटना आतापर्यंत सक्रिय नाही. सोशल मीडियावर चुकीचे रिल्स टाकले जातात, ट्विटरवर चुकीचे ट्रोलिंग होते. मोबाईल सबस्क्रायबर्स सिमकार्डवर प्रीपेड पैसे भरतो तेव्हा ते 30 दिवसांचे व्हायला हवे, पण मोबाईल पंपन्या फक्त 26 ते 28 दिवसांचेच देतात. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्पसाठी वायर्स शेतजमिनीतून गेल्या तर त्याचा मोबदला संबंधित शेतकऱयाला मिळत नाही. कॉल सेंटर्समध्ये मराठी तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होत नाहीत. यापुढे शिवसंचार सेनेच्या माध्यमातून शिवसेनेची या गोष्टींवर करडी नजर राहणार आहे.

कम्युनिकेशन क्षेत्रातही आघाडी घेऊ – आदित्य ठाकरे

जग बदलतेय. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान येतेय. त्या क्षेत्रात रोजगारही येत आहेत. मराठी तरुण-तरुणींना ते रोजगार मिळाले पाहिजेत. शिवसेना गेली पन्नास वर्षे बँकिंग व अन्य क्षेत्रांत मराठी तरुण-तरुणींना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण देतेय. कम्युनिकेशन क्षेत्रातही त्या दिशेने काम केले पाहिजे. शिवसंचार सेनेच्या माध्यमातून कम्युनिकेशन क्षेत्रातही आघाडी घेऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आता तंत्रज्ञान क्षेत्रातही शिवसेनेचा संचार सुरू – उद्धव ठाकरे

शिवसेना नेहमीच जनतेच्या हितासाठी काम करत असते, त्याचप्रमाणे शिवसंचार सेना म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी या नव्या संघटनेला शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचा सर्वत्र संचार आहेच, पण आजपासून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही शिवसेनेचा संचार सुरू झाला आहे, असे ते म्हणाले.

नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होतोय, पण त्या माध्यमातून पुणाची फसवणूक होत असेल तर ते सर्वथा अयोग्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांची, मोबाईल ग्राहकांची कंपन्यांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्याला वाचा पह्डण्याचे काम शिवसंचार सेना करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.