शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा

शक्तिपीठाच्या नावाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाणभरती शेतजमिनी अधिगृहित केल्या जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात कृषीक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटते आहे, तर दुसरीकडे शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर ताब्यात घेतल्या जात आहेत. सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये, अशी मागणी शिवसेनेने  आज लोकसभेत केली. शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात शक्तिपीठाचा मुद्दा उपस्थित केला. तिरूपती बालाजी, हैदराबादला जाण्यासाठी रस्ता जोडला जावा. त्यामुळे तिरूपतीला जाण्यासाठी मराठवाडय़ासह विदर्भातील लोकांची सोय होईल. परभणी ते पुणे, परभणी ते संभाजीनगर रस्ता सहापदरी करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी या वेळी केली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी करत असलेल्या कामाची प्रशंसा करताना जाधव यांनी संत तुकारामांचा ‘शुद्ध बीजापोटी’ हा अभंग सभागृहात म्हणून दाखविला.