
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना विभाग क्र. 2 च्या वतीने निषेध करण्यात आला. विभागप्रमुख अजित भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा प्रमुख संतोष राणे, अशोक पटेल, विधानसभा संघटक विकास दसपुते, गणेश गुरव, राजन निकम, राजू खान, मनोज मोहिते, राजू सकपाळ, अभिषेक शिर्पे, श्याम मोरे, अनंत नागम, गीता भंडारी, निखिल गुडेकर आदी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी संघटना फेडरेशनने अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, वामन कविस्कर, रमाकांत बने, नवनाथ महारनवर, दिवाकर दळवी, गोविंदभाई परमार, दीपक बांबाडे, शरदपुमार सिंह, प्रल्हाद जाधव उपस्थित होते.
शिवसेना वांद्रे पश्चिम विधानसभेतर्फे वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी विभाग संघटक रजनी मेस्त्राr, उपविभागप्रमुख सुदेश डुबे, विधानसभा संघटक शितल शेलार, उपविभाग संघटक मनीषा काsंडे, साधना वरसकर, संदिप मेटकर, सुनील जाधव, प्रफुल घरत, पांडुरंग वाघे, सुनील मोरे उपस्थित होते.