हिंदुविरोधी भाजप सरकारला शिवसेनेचा दणका! दादर येथील 100 वर्षे जुनं मंदिर पाडण्याचा डाव उधळला

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे. मुंबईतील दादर येथे 100 वर्ष जुने हनुमान मंदिर पाडण्याचा घाट भाजप सरकारने घातला होता. मात्र हिंदुविरोधी भाजप सरकारला शिवसेनेने दणका देत हा डाव उधळून लावला.

दादर मध्य रेल्वे स्टेशन येथे असलेले 100 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली होती. याबाबतीत माहिती मिळताच स्थानिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी त्वरेने हालचाल करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन हे पाडकाम थांबवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राम आणि हनुमान भक्तांनी शिवसेना, खासदार अनिल देसाई यांचे आभार मानले आहेत.