शिवसेनेचा रेकॉर्डब्रेक आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मशाल यात्रेचा समारोप

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जि. प. सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मशाल यात्रा काढण्यात आली होती. १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान सिंदखेडराजा मतदारसंघात पिंजून काढून आज शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक व मतदार संघाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळापासून ते तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढून मशाल यात्रेचा समारोप केला. या मोर्चाने संपूर्ण सिंदखेडराजा दणाणून गेले होते. आजपर्यंतच्या सर्व मोर्चाचे रेकॉर्ड आजच्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मोर्चाने तोडले.

शिवसेना जि. प. सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळापासून सिंदखेडराजा तहसीलवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकर्‍याची सरसगट कर्जमुक्ती झाली पाहिजे, घरकुल योजनेचे पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्या, मंजूर घरकुलांचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे, शेतीला २४ तास वीजपुरवठा करावा, साखरखेर्डा तालुका करण्यात यावा, रखडलेले ठिबक-तुषार सिंचन व शेती अवजारे अनुदान तात्काळ द्या, ई-पीक पाहणीची अट रद्द करून सरसगड मदत देण्यात यावी, वन प्राण्यांपासून होणारे शेती नुकसान थांबवण्यासाठी सुरक्षा कुंपन उभारून द्या, मातृतीर्थ सिंदखेडराजाचा विकास करावा, दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू करावा, साखरखेर्ड्यातील सूतगिरणी तात्काळ सुरू करा, राष्ट्रमाता जिजाऊ कृषी समृद्धी नवनगर कामाला सुरुवात करावी, जालना-खामगाव रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन रेल्वेस्टेशन सिंदखेडराजा व देऊळगावराजा येथे देण्यात यावे, शेतकर्‍याना बी-बियाणे, खत, शेत उपयोगी अवजारांना व मालाला हमी भाव देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी दिलीप वाघ, नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवत यांचेही भाषणे झाली. यावेळी शासनावर कठोर टिका केली. मोर्चेकरांच्या हातात लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाफलकांनी सिंदखेडराजा वासियांचे लक्ष वेधले. त्यामध्ये कापसाला १२ हजार, सोयाबीनला ८ हजार रुपये भाव द्या, एकच वाघ दिलीप वाघ, तुमच्या सुखदु:खात शिवसेना कालपण आजपण आणि उद्या पण, यासह मशाल चिन्हाचे फलकाचा समावेश होता. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, उद्धव साहेबांचे फोटो व सोबतच सरकार विरोधी घोषणांनी सिंदखेडराजा परिसर दणाणून गेला होता. दिलीप वाघ यांनी सिंदखेडराजा मतदार संघात मशाल यात्रा काढून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचविले व मशाल यात्रेचा शेवट रेकॉर्डब्रेक मोर्चाद्वारे आज करण्यात आला.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, शिवसेनेचे जि.प.सदस्य तथा मशाल यात्रेचे आयोजक दिलीप वाघ, शिवसेनेचे पदाधिकारी सर्वश्री सिद्धार्थ खरात, दिलीप चौधरी, बद्री बोडके, योगेश म्हस्के, महेंद्र पाटील, आशिष रहाटे, सिद्धू आंधळे, किशोर गारोळे, मसाजी वाघ, संजीवनी वाहक, रणजीत मरपळ, मरमट, अनिल मेहत्रे, शिवाजी ठाकरे, वागले, बबनराव मेहेत्रे, माधव मेहत्रे, शहजाद पठाण, शेख मुजाफर, संदीप चव्हाण यांच्यासह तालुक्यातून आलेले शेतकरी महिला शेतकरी यांच्यासह शाखाप्रमुख, गटप्रमुख तथा शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.