पाण्यासाठी कुर्ल्यात शिवसेनेची पालिका कार्यालयावर धडक, विभाग क्रमांक 6 च्या वतीने मोर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग क्रमांक 6 च्या वतीने विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा, मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभार, प्रस्तावित कचरा कर या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी कुर्ला येथील पालिकेच्या एल वॉर्ड कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.

यावेळी विभाग संघटक मनीषा नलावडे, कुर्ला-कालिना-चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विधानसभा प्रमुख, महिला-पुरुष विधानसभा संघटक, उपविभागप्रमुख, उपविभाग संघटक, विधानसभा समन्वयक, माजी नगरसेवक-नगरसेविका, उपसमन्वयक, महिला-पुरुष शाखाप्रमुख, शाखा संघटक, विभाग अधिकारी, महिला-पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसैनिक व रहिवासी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.