शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतून जनसागर उसळला. प्रचंड उत्साहात, फटाक्यांची आतषबाजी व गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोंढा मार्केट परिसरात सभा घेण्यात आली. भरउन्हात नागरिक सभेस उपस्थित होते. संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
महिला, तरुण, वृद्ध व नागरिकांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. या सभेसाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे यांनी केले. या सभेत बाबासाहेब थेटे, धनश्री आंबेकर, कुहिले, अविनाश गलांडे, अकील शेख, मजीद कुरेशी, जावेद शेख, सचिन वाणी, शिल्पा परदेशी, पंकज ठोंबरे, बाळासाहेब संचेती, भाऊसाहेब ठोंबरे यांची भाषणे झाली. डॉ. दिनेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अॅड. आसाराम रोठे, आनंदीबाई अन्नदाते, जितेंद्र जगदाळे, मनाजी मिसाळ, नंदकिशोर जाधव, वर्षा जाधव, अॅड. रमेश सावंत, साहेबराव औताडे, प्रभाकर बारसे, अॅड. एकनाथ कुंजीर, सुरेश शिंदे, कृष्णा धने, विलास घने, घनश्याम वाणी, देविदास वाणी, लिमेश वाणी, अनिल न्हावले, गोरख गावडे, संकेत वाणी, अक्षय साठे, ऋषिकेश राजपूत, अनिल डांगे, सारंगधर डिके, दिनेश राजपूत, सुरेश लाडवाणी, सौरभ संचेती, सूर्यभान जगताप, प्रवीण तांबे, अॅड. आर.डी. थोट, शैलेश चव्हाण, भाऊसाहेब गलांडे, भीमाशंकर तांबे, मधुकर पवार, सुरेश राऊत, धनंजय धोर्डे, दिगंबर मोरे, विवेकराजे निंबाळकर, भिका नाईकवाडी, भगवान गायकवाड, रमेश हाडोळे, विनायक गाढे, पप्पू गाळे, राजेंद्र कराळे, गोकुळ आहेर, दिलीप कुंदे, बाळासाहेब जानराव, अनिल गायकवाड, दत्तू गायकवाड, उत्तम साळुंके, पोपट धात्रक, रामेश्वर झिने, शरद निंबाळकर, अनिल निंबाळकर, भिकाजी साबळे, दत्तू खटाणे, लक्ष्मण खटाणे, प्रवीण निंबाळकर, ऋताज सोमवंशी, दिलीप बोरनारे, किरण बोरनारे, नीलेश बोरनारे, निखिल तांबे, जयश्री बोरनारे, भारती कदम, ज्योती सोमवंशी, गणेश गोरसे आदर्दीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.