महागाईनं जनता त्रस्त; सरकार वसुलीत मस्त, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची आक्रमक घोषणाबाजी

फोटो - सचिन वैद्य, सामना

राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात पावसाळीअधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमावतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’, ‘सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, राजन साळवी, उदयसिंह राजपूत, विलास पोतनीस, काँग्रेस आमदार भाई जगताप, यशोमती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राजेश टोपे आदि उपस्थित होते.

भाजी महागली, कडधान्य महागले, खत बियाणे महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई, महागाईने जनता त्रस्त महायुती सरकार वसुलीत व्यस्त अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडीने घोषणा देत महायुती सरकारला घेरले.

सरकार आहे वसुलीत मस्त, महागाईने जनता त्रस्त, खोके सरकार हाय हाय, महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बियाणांचा दर वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाई हाय हाय, केंद्रसरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)