समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी झटणाऱ्या व न्याय मिळवून देणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करून उमेदवार उदयसिंग राजपूत यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
तालुक्यातील वासडी, बहिरगाव, अंधानेर व कन्नडच्या माळीवाडा भागात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका घेतल्या.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले की, महायुतीच्या राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. महिला असुरक्षित आहेत, तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतीमालाला भाव नसल्याने बळीराजा खिंडीत सापडला असून, सर्वत्र समस्या आ वासून उभ्या आहेत. या सर्व प्रश्नांना महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास न्याय मिळेल. येत्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांना मतदान करण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
यावेळी तालुका संपर्कप्रमुख वामन कदम, तालुकाप्रमुख संजय मोटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, शहरप्रमुख डॉ. सदाशिव पाटील, सरपंच अशोक दाबके, माजी उपसभापती गीताराम पवार, कचरू शिरसे, सरपंच डॉ. केशव शिरसे, चेअरमन कौतिकराव पवार, मधुकर जाधव, हेमंत जाधव, किशोर सोनवणे, कुशिनाथ दापके, दादा गव्हाणे, डी.आर. जाधव, महिला आघाडीच्या सोनल पाटणी, विलास पाटणी, सुभाष घुगे, माणिक वाघ, मच्छिंद्र मुगले, खंडू मुगले, संजय दाबके, कैलास दाबके, कैलास राऊत, गोरख करवंदे, संजय पांडे, शिवनाथ मालकर, अशोक गोरे, लक्ष्मण दाबके, उपशहरप्रमुख चंद्रकांत लाडे, शहर युवा अधिकारी रामराजे देशमुख, प्रकाश काचोळे, बाबुलाल काळे, माणिक शिरसे, रामेश्वर वायडे, शिवाजी मोरे, प्रकाश जाधव, कृष्णा दापके, सोमिनाथ थोरात, पुंडलिक शिरसे, साईनाथ शिरसे, सय्यद नावेद, सोमनाथ जाधव, फुलचंद दापके, गणेश दापके, काशिनाथ राहणे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.