मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असे एका नेपाळ्याला वाटते; अनिल परब यांचा हल्लाबोल

आमच्या इथे सोसायटीमध्ये एक वॉचमन आहे. तो अख्खी रात्र ओरडत असतो – ‘जागते रहो.’ त्याला असे वाटते की, त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय. त्याला असे वाटतेय की, त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. हल्ली काय शाल-बिल घेऊन फिरतोय. त्याच्या जिवावर नाही तर हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, पण तसे करताना दुसऱ्याच्या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आमच्या धर्माने आणि बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.