डोंबिवलीतील एमआयडीसी येथील एका कंपनीत 20 दिवसांपूर्वी बॉयलर स्फोट झाला होता त्या दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 50 हून अधिक जखमी झालेले. ही घटना ताजी असतानात मंगळवारी पुन्हा ड़ोंबिवलीतील याच भागात एका कंमनीत स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. ही आग इतर कंपन्यांमध्येही पसरली असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये परत आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कंपन्यांचे फायर सेफ्टी ऑडिट सरकारने करून घ्यायला हवे. पूर्वीच्या घटनेतून सरकार काही शिकलेले दिसत नाही. असे उद्योग स्थलांतरित करण्यावर तातडीने भर द्यावा. आता इलेक्शन मोडमधून सरकारने बाहेर यावं. #Dombivalifire
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 12, 2024
डोंबिवलीत पुन्हा झालेल्या या स्फोटानंतर तेथील स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यससरकारवर निशाणा साधला आहे.
”डोंबिवली एमआयडीसीमध्ये परत आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या कंपन्यांचे फायर सेफ्टी ऑडिट सरकारने करून घ्यायला हवे. पूर्वीच्या घटनेतून सरकार काही शिकलेले दिसत नाही. असे उद्योग स्थलांतरित करण्यावर तातडीने भर द्यावा. आता इलेक्शन मोडमधून सरकारने बाहेर यावं”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.