शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वाजतगाजत विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी वरळीत भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेसाठी आज अर्ज दाखल केला. लोअर परळ पश्चिम येथील शिवालय सभागृहासमोरील शिवसेना शाखा क्रमांक 198 येथून आदित्य ठाकरे मिरवणुकीने वरळी इंजिनीयरिंग हब बीएमसी कार्यालयाकडे रवाना झाले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या मिरवणुकीत शिवसेनेचे नेते, पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
पक्षप्रमुख आज मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे व आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत व तमाम वरळीकरांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून १८२- वरळी विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सर्वोत्तम वरळीसाठी…
वरळीकरांच्या स्वप्नांसाठी…
मशालच!… pic.twitter.com/2AnPokVYkd— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2024
आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, प्रियांका चौधरी, अंबादास दानवे, सचिन अहिर, सुनील शिंदे, अजय चौधरी, आदेश बांदेकर, साईनाथ दुर्गे आणि आशिष चेंबुरकर उपस्थित होते. सर्वोत्तम वरळीसाठी…
वरळीकरांच्या स्वप्नांसाठी… मशालच असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.