मुसळधार पावसात कोसळलेले घर बांधण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

 

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा जबरदस्त तडाखा दहिसरलाही बसला. सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या या पावसामुळे दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक 3, केतकीपाडा येथे राहाणाऱया जितेन नाईक यांचे घर पूर्णपणे कोसळले. नाईक यांचा संसार उघडय़ावर आला. याची गांभीर्याने दखल घेत कोसळलेल्या घराचा ढिगारा बाजूला करत शिवसेनेने पुढाकार घेऊन जितेन नाईक यांचे उद्ध्वस्त झालेले घर पुन्हा बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नाईक यांना हक्काचे घर पुन्हा मिळणार असून त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे मनःपूर्वक आभार मानले.

घर कोसळल्यानंतर तिथे केवळ मातीचा ढिगारा उरला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दहिसर विधानसभा समन्वयक रोशनी कोरे गायकवाड यांनी तत्काळ ढिगारा बाजूला करून त्याच ठिकाणी घरभरणी करून संपूर्ण घर बांधण्यास सुरुवातही केली. सर्व साहित्य सामुग्री आणून देण्याची व्यवस्था केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख उमेश गायकवाड, विधानसभा संघटक कमल चिलबे, शाखाप्रमुख अजित जाधव, शाखा संघटक हेमा मयेकर, शाखा समन्वयक संजय दुबे, साजिदा शेख, उपशाखाप्रमुख नागेश शिरसाट, कामगार सेनेचे बापूसाहेब गजगे, कैलास चव्हाण, गट संघटक रुपा लष्कर, योगेश कवठे, अजय, संतोष कोंडापूर, विकास वाटुडे आणि स्थानिक उपस्थित होते.