गेल्या दोन वर्षांपासून नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असून त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱया रुग्णांना जादा पैसे खर्च करून खासगी लॅबमध्ये जाऊन एमआरआय चाचणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सोयीसाठी नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
नायर रुग्णालयात भरती असलेले सर्वसाधारण दहा ते बारा रुग्ण तसेच नवीन येणाऱयांपैकी दहा ते बारा रुग्णांची एमआरआय तपासणी सुचविली जाते. नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद असून ते दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत. यामुळे नाइलाजाने येथे येणाऱया रुग्णांना इतर पॅथोलॉजी लॅबमध्ये जाऊन जादा पैसे देऊन एमआरआय चाचणी करून घ्यावी लागते किंवा शीव रुग्णालयात जावे जागते. यामुळे रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. यासंदर्भात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून अत्यावश्यक बाब म्हणून 2024 च्या अर्थसंकल्पात केलेल्या निधीच्या तरतुदींचा वापर करून नायर रुग्णालयात दोन एमआरआय मशीन बसविण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर, रंजना नेवाळकर, चिटणीस संजय वाघ, अरविंद नागनुरी, प्रकाश शिंदे, महेश गुरव आदी उपस्थित होते.