सातारा, देवळाईच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवणार : राजू शिंदे

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना गुंठेवारीचा प्रश्न भेडसावत आहे. गुंठेवारी केली नसल्यामुळे दुप्पट मालमत्ता कर भरावा लागत आहे. प्लॉटचे खरेदीखत असूनदेखील बांधकामे नियमित नसून बेकायदेशीर असल्याचे मनपाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या भागात गुंठेवारीचा प्रश्न जटिल बनला आहे. या भागांतील गुंठेवारीचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी दिला.

यावेळी येथील नागरिकांशी राजू शिंदे यांनी संवाद साधला. राजू शिंदे म्हणाले, सातारा देवळाई ही गावे मनपात घेतली होती. ही गावे घेत असताना सुविधा देण्याचा विचार करण्यात आला नाही. शहरातील 114 वसाहती गुंठेवारीत येतात. ही पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे. 20 बाय 30 क्षेत्र गुंठेवारीत येतात. पण, सातारा-देवळाईचा पट्टा सातबारावर आहे. ती अनधिकृत कशी आहे, असा सवाल उपस्थित केला. हा प्रश्न विधानसभेत मांडला गेला तर गुंठेवारी कायद्यात सुधारणा होईल. हे काम नियमात नसतानाही करून घेतले जातात. सातारा, देवळाई, बजाजनगरात गुंठेवारी नसल्यास दुप्पट कर भरावा लागतो. ज्यांनी पैसे भरले त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. येत्या 20 तारखेला मशाल चिन्हाचे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राजू शिंदे यांनी केले. या कॉर्नर बैठकीला प्रभारी जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, फेरोज पटेल यांच्यासह स्थानिक रहिवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.