
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या कचरा टॅक्सला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर विभाग क्रमांक 9 च्या वतीने विभागप्रमुख प्रमोद शिंदे व विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने करत महाराष्ट्र सरकार व महापालिका प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.
या आंदोलनाला विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा प्रमुख निधी शिंदे, प्रणिता वाघधरे, विधानसभा संघटक निमिष भोसले, संजय नटे, आनंद जाधव, वत्सला पाटील, नीलम डोळस, रुक्मिणी भोसले, सुलभा पत्याने, प्रीतम निंबाळकर, माजी नगरसेवक रामदास कांबळे, श्रीकांत शेट्ये, उपविभागप्रमुख प्रशांत म्हात्रे, प्रभाकर भोगले, अमित शिंदे, संदीप भोईर, रोहिदास ढेरंगे, शाखाप्रमुख शेखर चव्हाण, शाखा संघटक मालती शेंडगे, युवासेना विभाग अधिकारी ऋषी नेलगे, वैभव जाधव, दिपेश चव्हाण उपस्थित होते.