
अणुशक्ती विभाग स्थानीय लोकाधिकार समिती बीएआरसी तारापूरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये सुमारे दोन हजार शिवभक्तांची उपस्थिती लाभली. यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, सरचिटणीस प्रदीप मयेकर तसेच स्थानीय लोकाधिकार समिती बीएआरसी तारापूरचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बाईक रॅली पार पडली. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध शिवशाहीर डॉ. देवानंद माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडय़ाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी समितीचे कार्याध्यक्ष दिलीप राऊत, सरचिटणीस संजय देसले, सहकार्याध्यक्ष जितेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष शेखर पाटील, नितिन पराते, गिरीश पाटील, खजिनदार विश्वास टेमक, कार्यालय प्रमुख हितेश साने, सहकार्यालय प्रमुख जयप्रकाश म्हात्रे, चिटणीस अविनाश सावंत, प्रशांत पाटील, समित कोरे, जितेंद्र वडे, समीर कांबळी, मिलन परमार, नीलेश पोळ, संदीप शिंदे, लक्ष्मण पवार, वैष्णव सगळे आदींनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका घारपांडे, छायाचित्रण दीपक भरसट यांनी केले.