
चेंबूर पांजरापोळ येथे आज शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. शिवसेना विभाग क्र. 9 आणि शिव स्मारक समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित राहून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने चेंबूर पांजरापोळ येथे हिंदू संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडले. यावेळी ढोलताशा, लेझीम, ऐतिहासिक साहसी खेळही सादर करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. यावेळी शिवसेना सचिव अॅड. पराग डाके, उपनेते सुबोध आचार्य, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभागसंघटक पद्मावती शिंदे, शीव कोळीवाडा विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, अंजली नाईक उपस्थित होते.