‘अदानी’ला दणका देत मुंबई विमानतळ येथे शिवजयंती! शिवरायांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

अदानी व्यवस्थापनाने दुर्लक्षित केलेल्या आणि जयंती साजरी करण्यास नकार दिला असताना शिवसेनाप्रणीत एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने मुंबई विमानतळ येथे शिवजयंती मोठ्या दणक्यात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुंबई विमानतळ येथे साजरी करण्यात येणार असल्याचे पत्र अदानी व्यवस्थापनाला एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने दिले होते. मात्र याबाबत व्यवस्थापनाने कोणतीही दखल न घेता दुर्लक्ष करीत परवानगीचे पत्रही स्वीकारले नाही.

मात्र शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, पदाधिकारी प्रदीप बोरकर, उल्हास बिले, संदीप गावडे, बाळासाहेब कांबळे व भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम आणि पदाधिकारी, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सहसरचिटणीस बाळा कांबळे, प्रवीण शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी रवींद्र कुडाळकर, सलील कोटकर, सतीश शेगले, दिलीप पिंगे, मिलिंद तावडे, राजा ठाणगे, विजय शिर्के, सूर्यकांत पाटील, उमेश सानप, अमोल कदम, अजित चव्हाण, संजय डफळ व भारतीय कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे असंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यासह कार्यक्रमाला स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, भारतीय कामगार सेना व एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या दणक्याने ‘अदानी’ची नरमाई

शिवसेनाप्रणीत एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने दणक्यात शिवजयंती साजरी करताना अदानी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली. येत्या काही दिवसांत या विषयावर शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन या विषयावर अंतिम तोडगा लवकरच काढला जाईल, असे याप्रसंगी आपले विचार मांडताना माजी आमदार आणि एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष विलास पोतनीस यांनी सांगितले आहे.