नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर रात्रभर उघडे ठेववण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. देशातील कोट्य़वधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेली साईबाबांची शिर्डी सलग सुट्ट्या आल्यामुळे आतापासूनच गर्दीने फुलून गेली आहे. ख्रिसमस आणि आगामी नवीन वर्षाची चाहूल यामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला रात्री साई भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.