
केवळ देशातच नाही तर विदेशात शिर्डीच्या साईबाबांचे भक्तगण आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी कायमच शिर्डीत जनसागर उसळलेला असतो. देश-विदेशातील साईभक्तांकडून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, महागड्या वस्तूंचे दान दिले जाते. या दानात अजून एक भर रविवारी पडली आहे. एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण केला आहे.
हे मुकुट 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम वजनाचे असून याची किंमत अंदाजे 12 लाख 70 हजार रुपये आहे. या मुकुटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. मुकुट अर्पण करणाऱ्या साईभक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे, असे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.