
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं गायल्याने मिंधे गटाला चांगलंच झोंबलं आहे. या गाण्याच्या बोलवरुन मिंधे गटाला इतका राग आला की त्यांनी थेट शोच्या सेटवर पोहोचत तोडफोड केली आहे. तसेच कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
काय आहे गाणं?
आपल्या शोमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर विनोद करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गाणं गायलं की, “ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, आँख पर चष्मा, मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर वो आये.” त्याच्या या गाण्याने मिंधे गटाला चांगलीच मिर्ची लागली आणि त्यांनी त्याच्या शोच्या सेटची तोडफोफ केली.
कुनाल की कमाल!
यावरच आपली प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, “कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहे. कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंग्यात्मक गाणे लिहिले तर शिंदे टोळी चिडली. त्याच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. देवेंद्रजी, तुम्ही एक कमजोर गृहमंत्री आहात!”
कुनाल की कमाल!
जय महाराष्ट्र! https://t.co/U4Jxdo4dCm— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2025