मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो, शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप

मंत्री कार्यालयात दलाल आणि फिक्सरांना थारा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या भूमिकेचे स्वागत होत असतानाच शिंदे गटाचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी भरविधानसभेत, मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटे वाटतो, असा गंभीर आरोप करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना आमदार बाबुराव कोहळीकर यांनी जलसंपदा विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला. वैधानिक विकास मंडळाची स्थापना करूनही

मराठवाडय़ाचा अनुशेष दूर झाला नसल्याकडे लक्ष वेधत

बाबुराव कोहळीकर म्हणाले, वैनगंगा नदीवर 1600 कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर करण्यात आले. याच कामाचे कंत्राट राजस्थानमधील कंपन्यांना देण्यात आले. या कंपन्यांची कामे काही ठिकाणी सुरू झाली आहेत. मात्र, स्थानिक लोप्रतिनिधींना त्यांची माहिती न देता परस्पर कामाचे कंत्राट दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

एक लाख रुपयांचे एखादे काम असेल तरी त्या ठिकाणी काम कोणत्या योजनेतून होत आहे त्याचा फलक लावण्यात येतो. त्याच्या उद्घाटनाला स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले जाते, पण एवढे मोठे काम होताना त्याची कुणालाही माहिती नाही. मोहित कंबोज नावाची व्यक्ती कामाचे वाटप करत असल्याचे मी ऐकले आहे. लोकहिताची कामे करत असताना त्याच्या भूमिपूजनाला संबंधित मंत्र्याला बोलवा, अथवा ज्यांनी काम दिले त्यांना बोलवा, असा टोला बाबुराव कोहळीकर यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि आका महाराष्ट्र लुटताहेत – हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री नावडत्या अधिकाऱयांना दलाल-फिक्सर म्हणून मंत्री कार्यालयातून बाहेर काढता, पण शेकडो कोटींची कंत्राटे मॅनेज करून वाटणारे मोठे फिक्सर हवेहवेसे आहेत का? शिंदे गटाच्या आमदारांनी जलसंपदा विभागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या कामाच्या वितरणाबाबत खळबळजनक आरोप केला आहे. या कंबोजचा मुख्य आका कोण आहे? सत्ताधाऱयांचे दलाल आणि आका मिळून महाराष्ट्र लुटत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.