
राज्यातील जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत या मागणीसाठी आज शेकडो उमेदवार थेट मंत्रालयात घुसले. सहाव्या मजल्यावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेरच जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणातही त्यांनी ठिय्या मांडून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
अशा आहेत मागण्या
n पहिल्या टप्प्यात कपात झालेल्या जिल्हा परिषदेच्या 10 टक्के तसेच रिक्त, अपात्र व गैरहजर जागांमधील एकही जागा मागे न ठेवता त्या विनाविलंब तातडीने पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात.
n आदिवासीबहुल पेसा क्षेत्रातील नॉन पेसा क्षेत्राच्या बिंदू नामावलीबाबत नवीन आरक्षण एसईबीसीच्या संदर्भाने शासनाने तातडीने निर्णय जारी करावा.
n पहिल्या टप्प्यातील पदकपातीवरच होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील चालू शिक्षक भरतीच्या पदांची कपात न करता त्या जागा पवित्र पोर्टलवर भरतीसाठी द्याव्यात.