
कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन महामंडळ आणि ग्रामीण पर्यटन स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी आज विधानसभेत केली.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना कोकणातील विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना सावर्डे गावातील पोलीस स्टेशन काढून टाकले. त्यामुळे चाळीस गावातील लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकर हे पोलीस स्टेशन बांधण्याची मागणी त्यांनी केली. वशिष्टी आणि जगबुडी नद्यांमुळे होणाऱ्या पुराच्या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुराचा धोका कमी करण्यासाठी 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प आखला आहे. नदीतील गाळ काढला तर फायदा होईल. ‘ब्ल्यू लाईन’, ‘रेड लाईन’च्या पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण केले तर पूररेषा नव्याने निश्चित करता येईल. कोकणचे कॅलिफोर्निया आपण ऐकतो; पण पर्यटनाला चालना देण्यासाठी रस्ते, पूल, वीज जोडणी, कमर्शिअल मीटरची गरज त्यांनी व्यक्त केली.