
शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परतरणार आहेत. असे विधान अवामी लीगचे नेते आणि शेख हसीना यांचे जवळचे सहकारी डॉ. रब्बी आलम यांनी केले आहे. तसेच शेख हसीना यांना आसरा दिल्याबद्दल आलम यांनी हिंदुस्थानचे आभारही मानले आहेत.
एएनआयशी बोलताना रब्बी म्हणाले की बांगलादेशचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पदमुक्त व्हावे आणि जिथून आलात तिथे परत जावं. शेख हसीना या पंतप्रधान म्हणून मायदेशी परततील. देशातल्या तरुणांची चूक झाली, पण ही त्यांची चूक नव्हती, त्यांच्यां संभ्रम निर्माण केला गेला असे आलम म्हणाले
बांगलादेशातील सध्याच्या स्थितीवर आलम यांनी चिंता व्यक्त केली. देशावर संकट आहे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. देशात दहशतवादी अराजकता वाढत आहे. आमच्या अनेक नेत्यांना हिंदुस्थानने आसरा दिला आहे त्या साठी आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही रब्बी म्हणाले.