‘मरता मरता वाचलो, मृत्यू डोळ्यासमोर होता आणि हातात 20-25 मिनिटं…’, शेख हसीन यांचा मोठा गौप्यस्फोट

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदुस्थानमध्ये आसरा घेतला आहे. गेल्या वर्षी झालेल्या रक्तरंजित आंदोलनानंतर त्यांना देश सोडावा लागला होता. त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. आता त्यांनी एका ऑडिओ संदेशाद्वारे मोठा खुलासा केला आहे. बांगलादेशमध्ये असतानाही आपल्याला अनेकदा जीवे मारण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. एवढेच नाही तर लहान बहिणीलाही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

शुक्रवारी रात्री उशिरा बांगलादेश आवाम लीगच्या फेसबुक पेजवर शेख हसीना यांचा ऑडिओ संदेश पोस्ट करण्यात आला. यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रेहाना आणि मी थोडक्याच बचावलो. मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आमच्या हातात फक्त 20-25 मिनिटे होती. आमच्या हत्येचे षडयंत्र अनेकदा रचण्यात आले होते. अल्लाहची इच्छा नसती तर मी आजपर्यंत बचावली नसती, असे शेख हसीना म्हणाल्या.

देश सोडला नसता तर माझी हत्या झाली असती. माझ्या आणि माझ्या बहिणींच्या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले होते. 21 ऑगस्टची घटनेतून वाचणे, कोटालीपारा बॉम्बस्फोटातून बचावणे आणि 5 ऑगस्टला मृत्यूला चकवा देणे ही केवळ अल्लाहची इच्छा होती, असेही त्या म्हणाल्या.

आपल्या हत्येचे षडयंत्र रचण्याची ही पहिली वेळ नसल्याचेही शेख हसीना म्हणाल्या. 21 ऑगस्ट 2004 रोजी ढाकामध्ये दहशतवादविरोधी रॅलीत हसीना यांना निशाणा बनवून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यात 24 लोकांचा मृत्यू आणि 500 हून अधिक लोक जखमी झाले होते. शेख हसीना या हल्ल्यातून बचावल्या होत्या. त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या.

बांगलादेशने शेख हसीना यांचा पासपोर्ट केला रद्द, हिंदुस्थानने व्हिसाची मुदत वाढवली

तत्पूर्वी 2000 मध्ये कोटालीपाहरा येथे 76 किलोग्राम आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी एका कॉलेजमधून 40 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले. याच ठिकाणी शेख हसीन यांची रॅली होणार होती