शहनाज गिलसाठी बिग बॉस 13 तिच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईण्ट ठरला. ती लाईमलाईटमध्ये आली. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिने नुकतेच काही फोटो इस्टाग्रामवर शेअर केले आणि अवघ्या काही वेळात चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटचा पाऊस पाडला. या फोटोंमध्ये शेहनाजने निकोलस जेब्रानने डिझाईन केलेला ऑफ शोल्डर लाल रंगाचा गाऊन घातला आहे. चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून गळ्यात मोत्याचे चोकर घातले आहे. तर ओठांवर न्यूड रंगाची लिपस्टिक लावली आहे.