1 फेब्रुवारीला शेअर बाजार सुरू राहणार

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 1 फेब्रुवारीला शनिवार आहे. परंतु, अर्थसंकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) ने शेअर बाजार खुला ठेववण्याची घोषणा केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पादरम्यानही व्यापार करण्याची संधी मिळेल. दोन्ही एक्सचेंजेस 1 फेब्रुवारी 2025 रोजी लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित करेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.