Share Market : काल लालेलाल, आज बाजार हिरवागार; निर्देशांक 1600 अंकांनी वधारला

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात भूकंप झाला. NDA ला अपेक्षित यश मिळत नाही हे सुरुवातीच्या कलाने स्पष्ट होताच बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 7 ते 8 टक्के घसरण खाली. यामुळं गुंतवणूकदारांचे 40 लाख कोटी बुडाल्याचा अंदाज आहे. मंगळवार प्रमाणे बुधवारीही बाजारात लाल निशाण फडकेल असे वाटत होते, मात्र आज बाजारात हिरवळ दिसून आली.

बुधवारी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1600 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 500 अंकांनी वधारला. यामुळे मरगळ आलेल्या बाजाराला नवसंजीवनी मिळाली. NDA पुन्हा सरकार स्थापन करण्याची चिन्ह दिसल्याने बाजारात हिरवळ आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.