बाजाराची घसरण; 2 महिन्यात झुनझुनवाला यांना बसला 15 हजार कोटींचा फटका…

शेअर बाजाराचे व्यवहार जोखमीचे असतात. त्यामुळे अनेकजण गुंतवणुकीसाठी मुच्युअल फंडची निवड करतात. मात्र, बाजारात यशस्वी आणि दिग्गज गुंतवणूकदार तसेच बिगबुल अशी राकेश झुनझुनवाला यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा पोर्टफोलियो त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळात आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी अनेक शेअर बॉटममध्ये म्हणजे कमी दरात खरेदी केले होते. त्यामुळे बाजार तेजीत असताना तसेच तो ऑल टाईम हायवर पोहचला असताना झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ काही हजार कोटींच्या फायद्यात होता. मात्र, बाजारातील घसरणीने झुनझुनवाला यांनाही फटका बसला आहे.

बाजाराने अंतरीम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ऑल टाईम हाय गाठला होता. त्यानंतर बाजारात घरण होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाजाराची घसरगुंडी सुरूच आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही कमजोर असल्याने त्याचाही परिणाम बाजारावर होत आहे. या दोन महिन्यांच्या काळात रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 15 हजार कोटींचा फटका बसला आहे. झुनझुनवाला यांची प्रामुख्याने टाइटन, टाटा मोटर्स आणि स्टार हेल्थ या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. बाजाराच्या घसरणीत हे शेअरमध्येही घसरण झाल्याने झुनझुनवाला यांचे नुकसान झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा इंडेक्स निफ्टीमध्ये 8 ते 9 अंकांची घसरण झाली आहे. तर झुनझुनवाला यांच्या कुटुंबाचा पोर्टफोलिसओची किंमत 13 टक्क्यांनी कमी झाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची किंमत 55,095.90 कोटी होती. तर मंगळवारी ( 19 नेव्हेंबर रोजी) त्यांच्या पोर्टफोलिओची किंमत 40,082.90 कोटी झाली आहे. म्हणजेच बाजाराच्या घसरणीने झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओलाही फटका बसला आहे.

झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या टॉप 5 पैकी एकानेही तेजी दाखवलेली नाही. त्यात टाइटन, कॉनकॉर्ड बायोटेक, स्टार हेल्थ एंड अलायड इंश्योरेंस, टाटा मोटर्स आणि मेट्रो ब्रांड्स यांचा समावेश आहे. त्यांची सर्वाधिक गुंतवणूक या कंपन्यांमध्ये आहे. त्यांच्या फोलिओतील कंपनीमध्ये 6 ते 24 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, गुतंवणूकदाराने बाजारातील घसरणीला घाबरु जाऊ नये, त्याकडे संधी म्हणून बघावे, असे राकेश झुनझुनवाला सांगत होते. त्यांनी या कंपन्यांमधिये विचारपूर्वक गुंतवणूक केली होती. त्यामुळे सध्या बाजारातील घसरणीमुळे त्यांना फटका बसला असला तरी बाजार तेजीत आल्यावर हे शेअरदेखील तेजीत जातील आणि त्यांना चांगला परतावा मिळेल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.