शेअर बाजार उसळला, गुंतवणूकदारांची चांदी

मागील आठवड्यात शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. या दोन दिवसांत गुंतवणूकदारांची चांदी झाली असून 12 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप गुरुवारी 397,12,330 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी बाजार घसरल्यानंतर हे मार्केट कॅप 385,59,355 असे झाले होते. गुरुवारी सेन्सेक्स 609 अंकांनी वधारून 74,340 अंकांवर बंद झाले. तर निफ्टी 207 अंकांनी वाढून 22,544 अंकांवर बंद झाले.