काळय़ा वर्णावरून टिप्पणी करणाऱ्याला सुनावले

शारदा मुरलीधरन यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाबद्दल काल मी एक टिप्पणी वाचली. माझे नेतृत्व माझ्या पतीच्या गोऱ्या रंगाएवढे काळे आहे, अशी टिप्पणी होती. मला माझ्या काळ्या रंगाचा अभिमान बाळगावा लागेल. सात महिन्यांच्या कार्यकाळात माझ्या त्वचेची तुलना माझे पती आणि केरळचे माजी मुख्य सचिव व्ही. वेणू यांच्याशी सातत्याने केली जातेय. काळा रंग म्हणजे काहीतरी लाजिरवाणे आहे, असे भासवले जातेय. काळं म्हणजे अशुद्धता, काळं म्हणजे दुःख, असंवेदनशीलता, अंधकार असंही म्हटलं जातंय, पण काळ्या रंगाचा द्वेष का केला जातोय. शारदा मुरलीधरन यांनी पुढं म्हटलंय, काळं सुंदर आहे. काळं आकर्षक आहे. मला आणि माझ्या मुलांनाही काळा रंग आवडतो.

लहानपणापासून काळ्या वर्णामुळे कसे असुरक्षित वाटत होते, त्याचे किस्सेही मुरलीधर यांनी सांगितले. त्यांच्या भावुक पोस्टला नेटिजन्सचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शारदा व त्यांचे पती व्ही. वेणू हे दोघेही आयएएसच्या 1990च्या तुकडीचे अधिकारी आहेत. केरळमध्ये 31 ऑगस्ट 2024 रोजी   निवृत्त होणाऱ्या व्ही. वेणू यांच्याकडून  शारदा मुरलीधरन यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी शारदा मुरलीधरन  प्रकाशझोतात आल्या होत्या.

त्वचेचा गोरा रंग हा आपल्याकडे सौंदर्याच्या मापदंडात वरच्या स्थानी मानला जातो. त्यामुळे अनेकदा काळ्या रंगाला नावे ठेवली जातात. अशीच वर्णभेदी टिप्पणी करणाऱ्यांना केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांनी फेसबुक पोस्ट करून सडेतोड उत्तर दिले आहे. मला माझ्या काळेपणाचा अभिमान आहे, अशा शब्दांत शारदा मुरलीधरन यांनी सुनावले.