रोहित पवार चांगले काम करत आहेत त्यात खोडा घालू नका अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच चांगल्या कामात मदत करता नाही आली तर त्या कामात खोडा घालू नका असेही पवार म्हणाले.
नगरमध्ये शरद पवार बोलत होते. रोहित पवारांनी दोन तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, पण या कामात काहींनी अडळथा आणला. पण मी रोहितला सांगितले की काळजी करू नको दोन महिन्यांत राज्याचे चित्र बदलेल. राज्यातली सर्व जिल्हे विकासाकडे वाटचाल करतील. यासाठी मला तरुणांची साथ हवी आहे, रोहित पवारांमध्ये ही ताकद आहे. तुम्ही रोहित पवारांनी साथ द्या असे आवाहन पवार यांनी केले.
तसेच कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू होते तर जुन्या नेत्यांना आनंद व्हायला हवा होता. पण अनेकांनी या कामाला विरोध केला, अडचणी आणायाचा प्रयत्न केला. कोणी चांगलं काम करत असेल तर त्यात खोडा घालू नये असे शरद पवार म्हणाले.