शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे बातमी समोर येत आहे. यामुळे त्यांचे पुढील चार दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हण यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना दिलीप चव्हाण म्हणाले की, ”शरद पवार यांचा 27 जानेवारी रोजी हिंगोलीत दौरा होता. मात्र काल रात्री त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला निरोप मिळाला की, साहेबांची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे त्यांना आराम करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यातच त्यांचे पुढील चार दिवसांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.”