अमित शहा सातत्याने जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेतृत्वाने घेतली आहे. अमित शहा यांच्या बोलण्याचा टोन अतिटोकाचा आहे. खरंतर अमित शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार काही वाटत नाहीत. त्यामुळे ते कोल्हापुरात शिकले की आणि कुठे हे मला माहिती नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
कोल्हापूर दौऱयावर आलेले शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला. देशाचे गृहमंत्री काही तारतम्य ठेवून भाष्य करतील अशी अपेक्षा असते, पण अमित शहा यांच्याकडून तसं काही दिसून येत नाही असेही पवार यांनी फटकारले.
दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा
राज्याचा मुख्यमंत्री असताना आपणही दावोसला गेलो होतो. पण काल जे करार झाले त्यातील बहुसंख्य कंपन्या हिंदुस्थानातील आहेत. फक्त एकाच विदेशी कंपनीने महाराष्ट्राशी करार केला आहे. 15 कंपन्या तर मुंबईतीलच आहेत. या कंपन्या गुंतवणूक करणार हे आधीच ठरले होते. मग त्या सगळ्यांना दावोसला निमंत्रित केले गेले. दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा दिखावा केला गेला असे शरद पवार यांनी सांगितले. भारत पर्ह्जशी करार झाला. भारत पर्ह्ज ही पुणे, कराडची कंपनी आहे. भारत फोर्जने तीन वर्षांपूर्वीच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता, असेही ते म्हणाले.
उद्योगमंत्री सामंत दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष पह्डायला?
उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये बोलताना मी पाहिले. दावोस येथे सामंत गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते की पक्ष पह्डण्यासाठी? दावोस येथे त्यांनी केलेली विधाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाचा जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती असा जोरदार समाचार शरद पवार यांनी घेतला. काही खासदारांचे पह्टो आपण पाहिले. पण ते खासदार शिवसेना पक्ष सोडून शिंदेंकडे जातील असे अजिबात वाटत नाही. कारण ते वाटेल ते करतील पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा कधी सोडणार नाहीत असे पवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला अधिक गर्दी होती
मुंबईत काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सभा घेतली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला अधिक गर्दी होती, असे शरद पवार यांनी सांगितले.