
छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितल्याचा भीमटोला लगावत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. अमित शहा यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे विधान बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळे यांच्या या विधानाचा शरद पवार यांनी समाचार घेतला. हा दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला आहे, असा टोला पवार यांनी लगावला.
पुण्यामध्ये भाजपच्या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शहा यांनी शरद पवार यांचा भ्रष्टाचाराचा सरदार असा उल्लेख केला होता. याला पवारांनी शुक्रवारी संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
View this post on Instagram
कायद्याचे उल्लंघन केले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केलेली व्यक्ती देशाचे गृहमंत्री म्हणून कार्य करीत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे. यावरून आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.