
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने दिलासा दिला. राज्य निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ ही मुक्तचिन्ह गोठवली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या चिन्हांचा फटका बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत ही दोन्ही चिन्ह गोठवली. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना, ते म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला. यापुढं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे. हा अतिशय उत्तम निर्णय झालाय. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवा, असेही शरद पवार म्हणाले.
View this post on Instagram
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘सुपरमॅन’च्या विधानावरही पवारांनी भाष्य केले. आता मला कल्पना नाही, ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचे लोक वक्तव्य करायला लागले. शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.
विशाळगडावर बाहेरच्या लोकांचा धुडगूस
विशाळगडाच्या खाली जो मुस्लिम समाज राहत होता, त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांमध्ये कोल्हापूरचं कोण होतं असं दिसत नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतोय. हायकोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे तिथे शांतता प्रस्थापित होईल, हिच अपेक्षा असे पवार यांनी स्पष्ट सांगितले.
पिपाणी आणि तुतारी चिन्हे गोठवली, राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाचा दिलासा