चार महिने द्या, मला सरकार बदलायचे आहे – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या इंदापूर, बारामती तालुक्यात दुष्काळी पाहणी दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा शरद पवार यांच्यापुढे मांडल्या. यावर बोलताना पवार यांनी आपल्याला येत्या पाच सहा महिन्यात सरकार बदलायचे आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले.

येत्या सहा महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. राज्यात सध्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शरद पवार यांनी अनेकदा राज्य सरकारकडे दुष्काळावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप राज्य सरकारकडून दुष्काळावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

बुधवारी शरद पवार यांनी इंदापूर बारामती येथे दुष्काळी पाहणीकेली व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, की येत्या चार सहा महिन्यात मला सरकार बदलायचे आहे. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे तशी धोरणं घेता येत नाही”