सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा त्रास दिला जातोय, उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्याप्रकरणी शरद पवार यांची टीका

यवतमाळमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासल्या. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना त्रास दिला जातो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, सत्ता त्यांच्या हातात आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. विरोधकांना त्रास देणे हाच सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आहे. हे सहन करावं लागेल. याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असेही पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)