भाजपच्या राजवटीत शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर, शरद पवार यांची मोदी सरकारवर खरमरीत टीका

भाजपच्या राजवटीत शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शेती मालाला भाव नाही, कवडीमोल भावाने शेत माल विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. आम्ही शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली. ही संवेदनशीलता मोदी सरकारकडे नाही, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दादागिरी करणाऱ्या व मतदारसंघाच्या विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या महायुतीच्या आमदाराला पराभूत करून

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. गंगापूर-रत्नपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज रविवारी गंगापूर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पाच महिन्यांत 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकार त्याकडे लक्ष द्यायला
तयार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

गंगापूर-रत्नपूर मतदारसंघील एकही प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाचा आमदार सोडू शकला नाही. गोदावरी नदी जवळ असूनही शेतीसाठी व पिण्यासाठी या तालुक्यात पाणी आले नाही. खोटी आश्वासने दिली जातात व फसवणुकीचे उद्योग करुन लोकांची मते मिळवली जातात हे इथे वारंवार घडत आले आहे. अशा शब्दांत शरद पवार यांनी विद्यमान भाजपा आमदारावर नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले. आता या तालुक्याचा विकासकरायचा असेल तर तुम्हाला परिवर्तन करावे लागेल. सतीश चव्हाण यांच्या मागे या निवडणुकीत उभे राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

प्रारंभी उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विजयी करण्याचे आवाहन करून विद्यमान आमदार यांना या तालुक्याचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश यावर भाष्य केले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक दिलाने काम करुन हा व्यापारी माणूस घरी बसवला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वाईट वागणाऱ्या भाजपला धडा शिकवावाच लागेल असे आवाहन त्यांनी केले. भूषणसिंह राजे होळकर यांनी देखील आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजी मंत्री प्रा. फौजिया खान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, भूषणसिंह राजे होळकर, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, जि. प. चे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र लघाणे, मोतीलाल जगताप, राजु वरकड, माजी आमदार किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, खाजा शरफुद्दीन मुल्ला, आबेद
मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांचा प्रवेश

मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा साखर कारखान्याचे संचालक दिलीप बनकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जि.प. सभापती मारुती साळवे, पुष्पा जाधव, मुजीब समाज आदींनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

जागिरदार, हाजी अकबर बेग, दिलीप बनकर, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, जगन्नाथ खोसरे, मोहसीन चाऊस, रावसाहेब तोगे, अंकुश काळवणे, विश्वजीत चव्हाण, लक्ष्मण सांगळे, सुवर्णा जाधव, अशोक गायकवाड, श्याम बनसोड, लक्ष्मण सांगळे, संपत छाजेड, दिनेश मुथा, आप्पासाहेब गावंडे, गजानन फुलारे, अनिल चव्हाण, अशोक खोसरे, किशोर कुकलारे, शोभा खोसरे, छाया जंगले, अर्चना सोमासे, अप्पासाहेब गावंडे, रमेश निचित, नईम मन्सुरी, मच्छिंद्र देवकर, सुभाष वरकड, नासेर पटेल, आयुब पटेल, सुनील धाडगे, अनिता खोसरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.