आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाई येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान शरद पवार मंचावर असताना त्यांच्याकडे कार्यकर्त्यांकडून एक चिठ्ठी आली. यात लिहिलं होतं की, गद्दारांचं काय? असा प्रश्न यातून विचारण्यात आला. यावेळी हीच चिठ्ठी कार्यकर्त्यांना दाखवत शरद पवार म्हणाले की, ”, गद्दारांना पाडा, पाडा पाडा.” शरद पवार असं म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ उभे असून यांच्याच प्रचारार्थ सभेत बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे.
या सभेत बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, ”ज्यांच्या हातात आज महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यांच्याकडून प्रश्न सुतार नाहीत.” पवार म्हणाले, लोकसभा निकालानंतर भाजपच्या काही गोष्टी लक्षात आल्या, नंतर त्यांनी काही निर्णय घेतले. याचंच एक भाग ही लाडकी बहीण योजना आहे. मध्यप्रदेश प्रमाणे हा निर्णय मागे पडेल, हीच आमच्या मनात शंका आहे.”
शरद पवार पुढे म्हणाले की, स्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत. अशी तुम्ही लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा ठेवता? महिलांच्या सन्मानाबाबत आम्ही कधीही केली नाही, असंही ते म्हणाले.