उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भूजबळ नाराज आहेत. त्या पार्श्वभुमीवर भूजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तृळात चर्चा रंगली आहे.
उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा फुले आणि सावत्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
भूजबळ नाराज
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भूजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. जहां नाही चैना वहा नही रेहना असे विधानही भूजबळ यांनी केले होते. त्या पार्श्वभुमीवर शरद पवार आणि छगन भूजबळ ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.