काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणीती शिंदे यांनी आज सकाळी अचानक दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले. या वेळी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी संताप व्यक्त करत प्रणीती शिंदे या भाजपच्या बी टीम असून, त्यांचे सोलापूर जिह्याच्या राजकारणातून नामोनिशाण मिटविणार असल्याचा इशारा दिला. कार्यकर्त्यांनी दक्षिण सोलापूर तालुका पिंजून काढला आणि भक्कमपणे अमर पाटील यांना साथ दिली. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.’