चौकीदार प्रामाणिक असता तर हल्ला झालाच नसता

काही लोक म्हणतात, मी चौकीदार आहे. चौकीदाराने त्याचे काम प्रामाणिकपणे केले असते तर असा हल्ला करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. पण इथे तर हल्लेखोर आले आणि आरामात निघून गेले. मग चौकीदार कुठे होता? चौकीदाराची कुठेच चर्चा होत नाही. आता म्हणत आहेत, आम्ही त्यांना धडा शिकवू वगैरे, असा टोला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी लगावला आहे.