
आपल्या धर्मात विश्वासघात हे सर्वात मोठे पाप आहे, हा सर्वात मोठा घात आहे, उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे. याचे दुःख आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय हे दुःख हलके होणार नाही, अशा शब्दांत सोमवारी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच जो विश्वासघात करतो, तो हिंदू असूच शकत नाही, असे परखड मतही व्यक्त केले होते. त्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला. यावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे शंकराचार्य यांनी परत एकदा परखड मत व्यक्त करत याबाबत बोलणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
राजकारणाशी आमचा काही संबंध नाही.मात्र राजकारण्यांनाही धर्माचे पालन केले पाहिजे. त्यांनी धर्माबाबत लुडबूड थांबवावी, आम्ही राजकारणावर बोलणार नाही, असे परखड बोल त्यांनी सुनावले. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. शंकराचार्यांसारख्या पूज्य व्यक्तींनी राजकीय वक्तव्य करणे अयोग्य आहे, अशी टीका काहींना केली. त्यावर आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करणे थांबवावे,आम्ही राजकारणावर बोलणे बंद करु, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
सोशल मीडियावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणाले की, आम्ही संन्यासी आहोत. आपण राजकीय वक्तव्य करू नये. हे पूर्णपणे बरोबर आहे. ते म्हणाले, ‘आम्ही एकाच तत्त्वाचे आहोत, पण राजकारण्यांनीही धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करू नये. पंतप्रधान मोदींनी मंदिरात येऊन धर्माची स्थापना केली तर तुम्ही लोक ते थेट दाखवता. शंकराचार्यांनी राजकारणाबद्दल काही सांगितले तर ते चुकीचे मानले जाते. राजकारण्यांनी धर्मात ढवळाढवळ करणे थांबवावे, आम्ही राजकारणावर बोलणे बंद करु, असे ते म्हणाले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ‘जे राजकारणी आहेत त्यांनी धर्म पाळू नये का? विश्वासघाताच्या पापाबद्दल आम्ही जनतेला सावध करू नये का? जर तुम्ही धार्मिक असाल तर कोणाचाही विश्वासघात करू नका. आम्ही राजकारणाबाबत काहीही बोललो नाही. आपण धर्माबद्दल बोललो आहोत. केवळ हिंदू आहोत असे ओरडून चालणार नाही. जेव्हा आपण धर्माचा अर्थ कळेल आणि त्याचा अवलंब करू तेव्हाच आपण हिंदू होऊ. लोकांच्या जीवनात धार्मिकता खऱ्या स्वरूपात रुजली पाहिजे, हे वेळोवेळी समजावून सांगितले पाहिजे. धर्माचार्याने असे केले नाही तर तो त्याचे काम करत नाही असे समजावे. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे धर्म समजावून सांगतो. राजकारणाशी आमचा काही संबंध नाही.मात्र राजकारण्यांनाही धर्माचे पालन केले पाहिजे. असे खडे बोल त्यांनी सुनावले