
श्री तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिवारी शनी अमावास्यानिमित्त भरलेल्या यात्रेत भाविकभक्तांकडून मोठ्या प्रमाणात शनीच्या तिजोरीत दान टाकले. यात्रा काळात शनिवारी २४ तासांत दानपत्र, सोने-नाणे यातून 1 कोटी 26 लाख रुपये उत्पन्न मंदिर देवस्थानला मिळाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. चालूवर्षी शनी अमावास्या वर्षभरानंतर आल्याने मोठी यात्रा भरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार शनिशिंगणापूरला यात्रेत जवळपास सात लाख भाविकांनी हजेरी लावली. शुक्रवार, दि. 28 रोजी रात्री बारा वाजल्यापासून यात्रेस प्रारंभझाल्याने राज्य व परराज्यातील भाविक आपली साडेसाती दूर व्हावी यासाठी शनीपुढे नतमस्तक झाले. अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दी झाली. यात काही भाविक विदेशातून आले होते. यात्राकाळात दानशूर भक्तांनी सोनं, चांदी, देणगी पावती, ऑनलाइन देणगी, दानपत्र आदींमधून देवस्थानला भरभरून दान दिले. 24 तासांत एक कोटी 26 लाख रुपये उत्पन्न जमा झाले. शिवाय साप्ताहिक दानपत्र मोजणीत ३० लाख रुपये मिळाले.
देवस्थानला मिळालेले उत्पन्न
कॅश काऊंटर ११ लाख ७८ हजार ८०२
पावती पुस्तक ९ लाख ६८ हजार ८४६
ऑनलाइन ८ लाख ९० हजार ३४८
तेल विक्री ११ लाख ६५ हजार ४६०
बर्फी प्रसाद विक्री ४४ लाख ४९ हजार
सोने-चांदी ९ लाख ३२ हजार
दानपत्र ३० लाख ४२ हजार ७१६